Friday, 16 November 2018

अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या आगामी सिनेमाचं नवं पोस्टर लाँच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

‘102 नॉटआऊट’ या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर लाँच झालं आहे. या पोस्टवरून हा सिनेमा विनोदी अंगाचा असल्याचं दिसतंय. या सिनेमात अमिताभ 102 वर्षांच्या वृद्धाची भुमिका साकारताहेत. तर ऋषी कपूर हे अमिताभ यांच्या मुलाच्या भुमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळतील.

या आगळ्यावेगळया काँबिनेशमुळे हा सिनेमा सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. तब्बल २७ वर्षांनंतर हे दोन दिग्गज पडद्यावर एकत्र झळकतील. या आधी ‘कूली’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ ह्या गाजलेल्या सिनेमांत दोघांनी एकत्र काम केलं होतं.

‘102 नॉटआऊट’ हा सिनेमा सौम्य जोशींच्या याच नावाच्या गुजराती नाटकावर बेतलेला आहे. हा सिनेमा 4 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अमिताभ आणि ऋषी कपूरांनी साकारलेली ही वेगळी भुमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय का, हे पहावं लागेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य