Thursday, 15 November 2018

ट्रोलला वैतागून, हिना खानची धमकी

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बहु हिना खानला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. ‘बिग बॉस11’ संपून 2 महिने झाले. ‘बिग बॉस11’ मध्ये हिना खान आणि शिल्पा शिंदे यांच्या वादविवादामुळे ‘शो’ला चांगलीचं टिआरपी मिळाली होती. ‘शो’मधील हिनाच्या वर्तनामुळे तिला ट्रोलला सामोरे जावे लागले.

हिना खान सोशल मिडिआवर खुप अॅक्टीव असते. हिनाने नुकताचं एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती असं काही बोलली की नक्कीचं तुम्हाला धक्का बसू शकतो.

शोमधील हिनाच्या वर्तनामुळे सोशल मिडियावर लोक नापसंती दर्शवत आहे. ज्यामुळे तिला सतत नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या. हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम वर नुकताचं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हिना आपल्या फॅन्सना सकारात्मक बोलण्याची विनंती करत आहे. ‘मला तुमच्या प्रेमाची आणि सकारात्मक उर्जेची गरज आहे. विशेषत: ट्विटरवरील निगेटीव्ह कमेन्टस पासुन दुर राहण्यास मदत करा, तसेच कोणत्याही खराब कमेन्टसना प्रतिसाद देउ नका, नाही तर मी खरचं माझे अकाउन्ट डिलीट करेन.’ हिनाच्या या व्हिडिओला खूप शेअर केले जात आहे.

 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य