Sunday, 18 November 2018

मराठी ‘बिग बॉस’चे होस्ट महेश मांजरेकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

हिंदी ‘बिग बॉस’ 11 मध्ये होस्ट सलमान खान ह्याने मराठी ‘बिग बॉस’ लवकरचं सुरु होणार असल्यचे सांगितले होते. मराठी ‘बिग बॉस’ कधी सुरू होणार आणि त्यात होस्ट कोण असणार याची उत्सुकता सर्वांना होती. याबाबतचं सस्पेन्स आता संपलं आहे.

मराठी इंडस्ट्रीमध्ये दबदबा असणारे निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी ‘बिग बॉस’चे होस्ट होणार आहेत. हिंदी ‘बिग बॉस’ मध्ये सलमान खानचं होस्टींग सर्वांना आवडतं. आता मराठी मध्ये महेश मांजरेकर कसं होस्टींग करणार हे औत्सुक्याचं असेल.

मराठी ‘बिग बॉस’चा होस्ट अभिनेता रितेश देशमुख होणार, अशी जोरदार चर्चा होती. बिग बॉस 11 ची विजेती मराठमोळी शिल्पा शिंदेने मराठी ‘बिग बॉस’मध्ये होस्ट होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता महेश मांजरेकर यांचे नाव समोर आल्याने सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मराठी ‘बिग बॉस’चं शूटिंग लोणावळ्याला होणार असून कलर्स मराठी वाहिनीवर 15 एप्रिल पासुन हा  रिअॅलिटी शो प्रक्षेपित होणार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य