Thursday, 15 November 2018

'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा आगामी 'बागी 2' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस 'एक दो तीन' या माधुरी दीक्षितच्या सुपरहीट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. तेजाब सिनेमामधील हे गाणं रिबूट केलं जात आहे.

या गाण्यातील जॅकलीनचा लूक समोर आला असून, जॅकलीनचा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. हा ड्रेस 'एक दो तीन' या गाण्यातील माधुरीच्या ड्रेससारखा कलरफूल असून जॅकलीनच्या ड्रेसमध्ये थोडा बदल केला आहे. एका मुलाखतीत जॅकलीन म्हणाली होती की,“माधुरीसारख्या लिजंडच्या गाण्यावर पुन्हा डान्स करणं माझ्यासाठी अवघड काम होतं. आम्ही जुन्या गाण्याला मॅच करण्याचा प्रयत्न करत नाही. माधुरीसारखा डान्स कोणीही करु शकत नाही. हा आमच्याकडून माधुरीला सलाम आहे."

माधुरीचे हे गाणे 80 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. आता या गाण्याला जॅकलीन किती न्याय देते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 'बागी-2' हा, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागी'चा सीक्वेल असून हा सिनेमा 30 मार्च, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य