Monday, 19 November 2018

12 वर्षानंतर सुपरहीट जोडीचा कमबॅक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सोनी टिव्ही वरील ‘जस्सी जैसी कोई नही’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धिस आलेली अभिनेत्री मोना सिंहला जस्सीच्या भूमिकेने ओळख दिली. या मालिकेमध्ये मोना सिंह सोबत अपूर्व अग्निहोत्री होता. अपूर्व आणि मोनाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता तब्बल 12 वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे.

एकता कपूरच्या ‘कहने को हम सफर है’ या वेबसिरीजमध्ये मोना दिसणार आहे. या वेब सीरिजमधून मोना वेबच्या दुनियेत पदार्पण करणार आहे. या वेबसीरिजमध्ये मोनाचा सह-कलाकार अपूर्व अग्निहोत्री असणार आहे. त्यामुळे 12 वर्षांनंतर प्रेक्षकांना मोना आणि अपूर्वची हिट जोडी पाहता येणार आहे.  या कार्यक्रमाची कहाणी अनैतिक संबधावर आधारित आहे. सुत्रांच्या अहवालानुसार या वेबसिरीजमध्ये अपूर्व पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘कहने को हमसफर है’ मध्ये रोनित रॉय आणि गुरदीप कोहली पती आणि पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मोना सिंह अन्नया मेहराची भूमिका साकारताना दिसेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य