Tuesday, 22 January 2019

‘तारक मेहता...’मधून दयाबेनची एक्झिट होण्याची शक्यता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

सब टीव्ही वाहिनीवरील आवडती मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' यामध्ये दयाबेनची भुमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी, ही मालिका सोडण्याची शक्यता आहे. मात्र निर्मात्यांनी या बातमीवर काहीचं मत मांडले नाही.

सब टीव्ही वरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा लोकांच्या पसंतीस ठरल्या आहेत. विशेषत; दयाबेनची भुमिका चांगलीच गाजली. बोलण्याच्या आणि गरबा खेळण्याच्या आगळ्या वेगळ्या अंदाजाने ही व्यक्तीरेखा चांगलीच लोकप्रिय झाली. दिशा वकानी यांनी 6 महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह घेतली होती. सप्टेंबर महिन्यापासून, दयाबेन तारक मेहता मालिकेत दिसत नव्हती. नोव्हेंबर महिन्यामध्ये दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाच्या संगोपनात दिशा व्यस्त असल्याने ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जातेय.

‘दिशाची मुलगी लहान असून, कुटुंबीयांना तिची गरज आहे. दिशाच्या मालिकेतील कमबॅकवर अद्याप कोणतीही बोलणी केलेली नाही त्यामुळे दिशा मालिका सोडत आहे हे म्हणणं चुकिचं ठरेल.’ असं असित कुमार म्हणाले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW