Sunday, 23 September 2018

संग्रामचं ‘तुमच्यासाठी काय पण' आता फक्त खुशबूसाठी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठी मालिका 'देवयानी' मधील' तुमच्यासाठी काय पण' असं म्हणत लोकप्रिय झालेला अभिनेता संग्राम साळवी बोहल्यावर चढला आहे. हिंदी आणि मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडेसह संग्रामचा लग्नसोहळा सोमवारी पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्यात अनेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

चद्रशेखर गोखलेंच्या ‘सांजबहर’मध्ये संग्राम आणि खुशबू एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या वर्षी मे महिन्यात संग्राम आणि खुशबू यांचा साखरपुडा झाला होता.

'एक मोहोर अबोल' मालिकेतून खुशबू तावडेने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. या मालिकेत तिने साकारलेल्या नकारात्मक व्यक्तिरेखेचं कौतुक झालं होतं. हिंदी मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘तेर लिये’, ‘सिंहासन बत्तीसी’, ‘तेरे बिन’ तर मराठी मालिकांमध्ये ‘धर्मकन्या’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘पारिजात’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खुशबूने काम केले. खुशबूची धाकटी बहीण तितिक्षा तावडे सध्या 'सरस्वती' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

संग्राम आणि खुशबूच्या लग्नसोहळ्यात, सुयश टिळक, नम्रता आवटे, अमित कल्याणकर, खुलता कळी खुलेना फेम अभिज्ञा भावे, यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Sep 22 16:15:44 +0000 2018

समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या नगरीत धक्कादायक घटना... 13 वर्षांच्या मुलाची काढली नग्न धिंड... 'फॅण्ड्री'… https://t.co/T90cyE2omG
Jai Maharashtra News
Sat Sep 22 15:53:08 +0000 2018

पैसे मागण्यासाठी चाळीमध्ये आले होते तृतीयपंथी... मात्र त्यातील एका तृतीयपंथीने मात्र केली धक्कादायक गोष्ट... वाचा स… https://t.co/nspdlik02q

Facebook Likebox