Sunday, 18 November 2018

‘परी’ सिनेमा पाहिल्यानंतर विराटचं ट्विट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा बहुचर्चित ‘परी’ सिनेमा होळीच्या मुहूर्ताला म्हणजेच 2 मार्चला रिलीज झाला. सिनेमा पाहताच विराटने ट्विटर द्वारा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'परी' या सिनेमाचा टीझर पाहतानाच समजले होते की अनुष्का शर्मा एका भयावह भूमिकेत दिसणार आहे. टिझर पाहताच हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला होता. अनुष्काच्या लग्नानंतर प्रदर्शित झालेला हा पहिलाचं सिनेमा आहे. विराट त्याच्या ट्विटर अकाऊंट द्वारा टीझर, ट्रेलर, स्क्रीमर शेअर करत होता, तो या सिनेमाबाबत किती उत्सुक आहे, हे समजत होते. विराटने ‘परी’ चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. सिनेमा पाहताच विराटने ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विराटने ट्विट केल की, “ मी काल रात्री ‘परी’ पाहिला. आतापर्यंतची माझ्या बायकोची ही सर्वोत्तम भूमिका आहे. बऱ्यांच काळानंतर एक सर्वोत्कृष्ठ सिनेमा पाहिला. सिनेमा पाहताना थोडी भीती वाटली, पण मला तुझा अभिमान आहे, अनुष्का शर्मा.”  सिनेमा पाहून विराटने अनुष्काच्या भूमिकेचं आणि सिनेमाचं भरभरुन कौतुक केलं.

अनुष्काने या आधी ‘फिल्लौरी’ सिनेमात एका भटकत्या आत्म्याची भूमिका साकारली होती. पण परी सिनेमाचा टिझर पाहता दोन्ही भूमिकेत साम्य असल्याचे समजते.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य