Tuesday, 20 November 2018

हृतिक रोशन पुन्हा करतोय लग्न! नवरीचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. 2014मध्ये सुझान खान सोबत घटस्फोट घेतल्यानंतर हृतिकचे नाव अभिनेत्री कंगना राणावतशी जोडले गेले होते. मात्र, त्यांच्यातील वादामुळे हे नातेही तुटले. सध्या अशी चर्चा सुरु आहे की हृतिक आपल्या मुलांसाठी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. लग्नासाठी हृतिकने अशी मुलगी निवडलीये जी तिच्या घरच्यांनाही पसंत पडेल. रिपोर्ट्सनुसार, घरच्यांशी चर्चा करुन मुलीची निवड करण्यात आलीये. हृतिकच्या होणाऱ्या नवरीला कदाचित तुम्हीही ओळखता. मात्र, हे नाव वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. तुमची उत्सुकता आम्ही अधिक ताणून ठेवणार नाही. जाणून घ्या कोण आहे हृतिकची होणारी नवी बायको.

हृतिक आणि त्याची पत्नी सुझान यांच्यातील दुरावा संपलाय. दोन्ही कुटुंबानी केलेल्या प्रयत्नानंतर हृतिक आणि सुझान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकत असल्याचे समजतेय. 2014 मध्ये दोघांनी स्वेच्छेने घटस्फोट घेतला. यानंतर आता हे दोघेही पुन्हा लग्न करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, याबाबत दोघांच्याही घरच्यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य