Wednesday, 16 January 2019

'पद्मावती'च्या नावानं लटकवला मृतदेह

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पद्मावती चित्रपटाच्या वादाला आता वेगळं वळण मिळाल्याचं दिसून येतंय. राजस्थानच्या नहरगड किल्ल्याच्या भिंतीवर एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

मृताची ओळख पटली असून चेतन सैनी असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याचं समोर येतंय. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी दगडांवर धमकी वजा संदेशही लिहिलाय.

"हम पुतले जलाते नही लटाकते है", "चेतन तांत्रिक" तसेच "पद्मावती" अशा आशयाचा संदेश इथे लिहिण्यात आलाय. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला असता मृतदेहावर जखमा असल्याचं निष्पन्न झालंय.

एकीकडे 'पद्मावती' चित्रपटाच्या विरोधात या तरुणानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. तर, दुसरीकडे ही हत्या कोणत्या तरी दुसऱ्याच उद्देशानं केली असावी आणि याला पद्मावती वादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशाप्रकारे दोन्ही बाजुने या हत्येचा तपास सुरु आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 07:25:21 +0000 2019

अखेर बेस्ट संपावर तोडगा निघाला 8 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे वाचा सविस्तर - https://t.co/QEks9HmvJi… https://t.co/EIrisBh5Kh
Jai Maharashtra News
Wed Jan 16 06:58:17 +0000 2019

#JMBreaking बेस्ट कामगार संघटनांनी संप मिटल्याची घोषणा करावी - हायकोर्ट - https://t.co/emV9tmZSev #पाहाJMLive… https://t.co/iNcUE7k6BY