Saturday, 18 November 2017

वादांच्या कचाट्यात सापडलाय संजय लीला भनसाळींचा ‘पद्मावती ‘

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संजय लीला भंसाळींचा पद्मावती हा सुरुवातीपासूनच वादाच्या कचाट्यात सापडलाय. 1 डिसेंबरला प्रदर्षित होणाऱ्या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कधी चित्रपटाचा सेट जाळला जातो, तर कधी चित्रपटसंदर्भातील रांगोळी विस्कळीत करण्यात येते. या सर्व प्रकारानंतर आता पद्मावती चित्रपटाच्या वादात राजस्थान सरकार हस्तक्षेप करणार आहे. चित्रपटात नेमकं काय चुकीचं आहे, हे पाहण्यासाठी राजस्थान सरकारनं समिती स्थापन केली आहे.

ही समिती चित्रपट पाहणार, त्यातील वाद जाणून घेणार आणि त्यानंतर प्रदर्शनाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध होतोय. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यावर सुनावणीस नकार दिला आहे.  

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Nov 18 14:52:18 +0000 2017

आमच्या जिजाऊ महाराजांचा जन्म विदर्भातला तर शिवाजी महाराजांचा पुण्यातल्या. स्वतंत्र विदर्भ करून तुम्ही माय-लेकाची ता… https://t.co/WJybfUXPj5
Jai Maharashtra News
Sat Nov 18 14:49:10 +0000 2017

समृद्धी महामार्गातून महाराष्ट्राची समृद्धी होणार असेल तर मला समृद्धी मार्ग मान्य पण, याच्या माध्यामातून महाराष्ट्र… https://t.co/ZqrDXOY89q