Tuesday, 13 November 2018

मिलिंद शिंदेना “तांबडे बाबा” पावले; दीपाली सय्यदचे नशिबही फळफळले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी सिनेमा, मालिका आणि नाटकांमधील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना आज म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे.

झी मराठीवरील 'तू तिथे मी' या मालिकेत मिलिंद शिंदे यांनी दादा होळकर ही भूमिका साकारली होती. त्यात ते सतत तांबडे बाबांची पूजा करताना दाखवले होते. त्यामुळे त्यांना घर लागल्याचं जाहीर होताच, शिंदेंना तांबडे बाबा पावले, अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होतेय.

म्हाडातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतींतील 819  सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात संगणकीय सोडत काढण्यात आलीय. यंदा 819 सदनिकांच्या सोडतीसाठी 65,126 अर्जदार पात्र ठरलेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली या ठिकाणी आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य