Wednesday, 23 January 2019

आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा डास आला आहे - प्रणिती शिंदे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदींविरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.

सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे, त्यांचे नाव आहे मोदीबाबा, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे. त्यांच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय असं प्रणिती शिंदे यांनी म्हटंले आहे.

‘मोदींना खोटे बोलण्याची सवय लागली आहे, 15 लाख जमा करुन देतो असं म्हणाले होते, कुठे गेले ते पैसे? नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला. मोदींना ना बहिण आहे, ना बायको, ना मुलगी आहे. त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल समजणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही’, असे प्रणिती शिंदे म्हटंले आहे.

विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाषणात सोलापूरचे खासदार शरद बनसोडेंचा बेवडा म्हणून उल्लेख केला. काँग्रेसच्या काळातील केलेल्या कामाचे उद्घाटन दोन्ही मंत्री आणि बेवडा खासदार करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

loading...