Wednesday, 23 January 2019

भारतात होणार हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतात येत्या 18 महिन्यात हाय स्पीड इंटरनेट युगाची सुरूवात होणारंय.. गेल्या वर्षी अमेरिकेला मागे टाकत वेगवान इंटरनेट सेवा देणारा भारत चीननंतरचा दुसरा देश ठरला.

 

तरीही आशियाई देशांमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवेत भारत मागे आहे. मात्र आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो तीन उपग्रह पुढील 18 महिन्यात

अंतराळात सोडणार आहे.

 

त्यामुळे संपूर्ण भारतातला इंटरनेट स्पीड वाढणार आहे. यापैकी पहिलं कम्युनिकेश सॅटेलाईट म्हणजे जी-सॅट 19 हे जून महिन्यातच अंतराळात पाठवलं जाणार. त्यानंतर

जी-सॅट 11 आणि जी-सॅट 20 प्रक्षेपित केलं जाईस, अशी माहिती ‘इस्रो’चे चेअरमन किरन कुमार यांनी दिली.

 

या वर्षाच्या अखेरपर्यंत जी-सॅट 11 हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. याद्वारे 13 गीगाबाईट डेटा प्रति सेकंद ट्रान्सफर केला जाऊ शकतो. तर 2018 च्या अखेरपर्यंत

जी-सॅट प्रक्षेपित करण्याची योजना आहे, ज्याद्वारे 60 ते 70 गीगाबाईट प्रति सेंकद एवढा डेटा स्पीड मिळेल.

loading...