Wednesday, 23 January 2019

Innelo 1 भारतात लाँच, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

iPhone X या स्मार्टफोनला लाँच करून 2 वर्ष झाली असून बाजारात iPhone X सारखे अनेक मॉडल पाहायला मिळतात.

अॅपलने या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये नॉच दिले आणि दुसऱ्या कंपन्यांनीही अशाच पद्धतीने आपले स्मार्टफोन लाँच केले.

चीनी स्मार्टफोन मेकर iVoomiची सब ब्रॅँड इनेलो ने 7,499 रुपये iPhone X सारख्या दिसणाऱ्या नॉचसह आपला स्मार्टफोन Innelo 1 लाँच केला आहे.

डिस्प्ले नॉचसह भारतीय बाजारात येणारा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, मात्र या स्मार्टफोनची विक्री फक्त ऐमेज़ॉनवरच करण्यात येणार आहे.

या स्मार्टफोनची विक्री 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

या स्मार्टफोनचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये डुअल 4G सपोर्ट देण्यात आले आहे.

याशिवाय यामध्ये अनलॉक आणि रियर फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आले आहे.

 

Innelo 1 चे फीचर

  • MTK6737H प्रोसेसर
  • डिस्प्ले 5.86, ऐस्पेक्ट रेश्यो 19:9 
  • ग्लास 2.5D कर्व्ड 
  • 2GB रॅम
  • इंटरनल मेमरी 16GB  माइक्रो एसडी कार्ड द्वारे याला 128GB पर्यंत वाढवण्यात येऊ शकते.

 

या स्मार्टफोनच्या रियरमध्ये सॅमसंगचा 13 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे, सेल्फीसाठी यामध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटीसाठी यामध्ये डुअल 4G सपोर्टसह वोल्टी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि माइक्रो यूएसबी पोर्टसारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन Android Oreo 8.1 वर चालतो, आणि ज्यामध्ये कंपनीचा ओएस SmartMe OS 3.0 देण्यात आला आहे.

loading...