Wednesday, 23 January 2019

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कॉटन ग्रीन स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दहीहंडीच्या दिवशी आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसटीएस) जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेचे पथक घटनास्थळी असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  गेल्या तासाभरापासून हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प आहे. तर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूकही १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. दहीहंडीनिमित्त मुंबईतील सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी खासगी कंपन्यांची कार्यालये सुरु आहेत.

loading...