Wednesday, 23 January 2019

Google Mapsवर लोकेशनसह आता फोनची बॅटरीही करता येणार शेअर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गुगलच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती सहजरीत्या मिळवता येते तसेच आपल्याबाबतची माहितीदेखील आपल्या माणसांना देता येते.

त्याचप्रमाणे गुगलने एक नवीन खास फीचर आणलं आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या लोकेशनसह फोनमधील बॅटरीचे प्रमाणही शेअर करता येणार आहे.

गुगल मॅप्सने 2017 च्या सुरुवातीला एक फीचर तयार केले होते ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुंटुंबासह मित्रांना तुमचं रियल टाइम लोकोशन शेअर करु शकत होता.

त्याचप्रमाणे आता गुगल मॅप्समध्ये आणखी एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. ज्यामध्ये तुमच्या फोनची बॅटरी किती आहे याची माहीती इतरांना देता येणार आहे.

 

जाणून घ्या गुगल मॅप्सच्या या नवीन फिचरबद्दल

  • या फिचरच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना तुमचं रियल टाइम लोकेशन शेअर करत आहात तर त्यासोबतचं तुमच्या फोनचे बॅटरी पर्सेटेंजदेखील शेअर होईल.
  • यामुळे तुमच्या रियल टाइम लोकेशनसह फोनमील बॅटरीचे प्रमाण किती आहे याची माहितीदेखील समोरच्या व्यक्तीला मिळेल.
  • त्यामुळे आता जर तुमच्या मित्रमैत्रीणींचा किंवा कुटुंबियांचा फोन लोकेशन शेअर करत असताना मध्येच बंद झाला तर चिंता करण्याची काही गरज नाही.

 याशिवाय भारतीय गुगल यूजर्ससाठी गुगल लवकरचं टू-व्हीलर मोड हे एक खास फिचर घेऊन येणार आहे.

ज्यामुळे बाईक चालवणाऱ्यांना शार्टकट रस्ता सांगितला जाणार आहे.

तसेच हा फिचर यूजर्सना ट्रॅफिक आणि अराइवल टाइमदेखील सांगणार आहे.

मात्र हा फिचर गाडी किंवा बससाठी नसून फक्त बाईक चालकांसाठीचं उपलब्ध केला जाणार आहे.

loading...