Wednesday, 23 January 2019

रेल्वेमार्गावरील पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच मध्य रेल्वेवर परेल स्थानकात अप फास्ट मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर रेल्वेमार्गावर कोणताही मेगाब्लॉक आज घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वेवरील परेल स्थानकात ब्रिजच्या कामासाठी सकाळी 08.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावरील वाहतूक माटूंगा ते भायखळा स्थानकांदरम्यान बंद असेल. तसंच ट्रान्सहार्बरवर ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तसंच पश्चिम रेल्वेवरही बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल, वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे.
आज हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसेल.

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान आज सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे मेगाब्लॉकच्या काळात ट्रान्सहार्बरची वाहतूक बंद असेल. 

loading...