Wednesday, 23 January 2019

अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्व रोग्य निदान शिबिराचं आयोजन करण्यात  आले . माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आले. या शिबिराचा 2 हजार गावकऱ्यांनी लाभ घेतला. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहचावी हा त्यामागचा उद्देश होता.

या शिबिरात निदान झालेल्या गंभीर रोगांवर मुबई , पुण्यातील नामवंत डॉक्टरांकडून उपचार केले जातील, ह्दय विकारावरच्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जातील, तसेच नेत्रविकारापासून अस्थिरोगांपर्यंत या शस्त्रक्रिया करून डोळ्यांना चष्मा व गरजू रुग्णांना कृत्रिम पाय देखील दिले जातील.

loading...