Wednesday, 23 January 2019

भुयार खोदून टाकला दरोडा, 27 लॉकर्स लुटून चोरटे पसार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 चक्क भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकलाय. नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदाची शाखा लुटून, कोट्यवधी रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. मध्यरात्री नवी मुंबईच्या जुईनगर सेक्टर 11 मध्ये ही घटना घडलीय. चोरट्यांनी बँके शेजारील दुकानामध्ये खड्डा खणून, तिथून बँकेपर्यंत बोगदा तयार केला.

त्या बोगद्यातून बँकेत शिरुन, त्यांनी 27 लॉकर्स लुटलेत. ही चोरी शनिवारी किंवा रविवारी रात्री झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बॅंकेतील एक ग्राहक सोमवारी जेव्हा आपलं लॉकर उघडण्यासाठी लॉकर रुममध्ये गेला, त्यावेळी आजूबाजूचे 27 लॉकर्स तोडल्याचं दिसून आलं. 

loading...