Wednesday, 23 January 2019

इकबाल कासकर बाबतीत आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या इकबाल कासकरबाबत तपासणी दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

इकबाल कासकरचे जीमेल अकाऊंट असल्याची माहिती समोर आली आहे. 2003 मध्ये इकबालच्या मुलानं त्याला हे जीमेल अकाऊंट उघडून दिलं होतं. या अकाऊंटचा पासवर्ड विसरल्याचे इकबालने सांगितले आहे.

 

मात्र, याबाबत ठाणे पोलीस प्रशासन गुगलकडे चौकशी करणार आहेत. तर, दाऊदची प्रकृती ठीक असून काही दिवसांपूर्वी दाऊद पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचारासाठी आला होता आणि दाऊदला किडनीचे आजार असल्याची माहितीदेखील तपासणीदरम्यान समोर आली आहे.      

loading...