Wednesday, 23 January 2019

...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाणे शहरात शनिवारी रात्री एक दुर्देवी घटना घडली आहे. ठाणे कळवा येथे राहणाऱ्या अर्चना कदम या महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करुन स्वतआत्महत्या केली आहे. ही दोन्ही मुले जुळी असून गतीमंद असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांना घटनास्थळावरुन एक सूसाइड नोट मिळाली आहे, या नोटमध्ये अर्चना या महिलेने गतीमंद मुलांना कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

 

32 वर्षीय अर्चना कदम त्यांच्या वरद आणि सार्थक या 7 वर्षांच्या मुंलांसह पती संदीप कदमसह कळव्याच्या जीवन आनंद विहार सोसायटीमध्ये राहत होत्या. पती संदीप एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. शनिवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास संदीप यांनी या तिघांना घरात मृतावस्थेत पाहिले.

 

दोन मुलांचा गळा दाबून नंतर स्वत:  गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कळव्यातील छत्रपति शिवाजी या हॉस्पिटलमध्ये देण्यात आले आहेत. माहागाईमुळे दोन्ही मुलांवर उपचार करताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सूसाईड नोटमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

loading...