الأربعاء، 14 تشرين2/نوفمبر 2018

वर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास?

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

वृततसंस्था, नवी दिल्ली

19 ऑगस्ट हा दिवस जगभरात फोटोग्राफी डे साजरा केला जातो. हा दिवस सर्व फोटोग्राफर्सना समर्पित केला जातो.

कारण फोटोग्राफर्सनी काही विशिष्ट आणि महत्वाच्या क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून एक आठवण तयार केली असते.

काय आहे या दिवसाचा इतिहास?

वर्ल्ड फोटोग्राफी डे 19 ऑगस्टला साजरा करण्यामागे एक इतिहास आहे. ही घटना आहे 179 वर्षापूर्वीची.

या घटनेची सुरुवात फ्रांसमध्ये 9 जानेवारी 1839 पासून झाली.

त्यावेळी डॉगोरोटाइप प्रक्रियेची घोषणा करण्यात आली होती.

या फोटोग्राफी प्रक्रियेची निर्मिती जोसेफ नाइसफोर आणि लुइस डॉगेर यांनी केली होती आणि ही जगातील पहिली फोटोग्राफी प्रक्रिया होती.

यानंतर 19 ऑगस्ट 1839 मध्ये फ्रांस सरकारने या अविष्काराची घोषणा केली.

या दिवसाच्या स्मरणार्थ ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरा केला जातो.

या अविष्कारामुळे आज प्रत्येकाला आपल्या आवडत्या क्षणांना कॅमेऱ्यात कैद करून तोचं क्षण पुन्हा नव्याने जगता येतो.

loading...

Top 10 News

राशी भविष्य