الخميس، 17 كانون2/يناير 2019

WORLD HEPATITIS DAY : हे वाचा आणि ओळखा हेपेटायटिसचा धोका

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जन्मदिनाचे औचित्य जागतिक किर्तीचे संशोधक डॉ. बरूच ब्लूमबर्ग यांनी ‘हेपेटायटिस ई’ या विषाणूचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ जुलै हा दिवस जागतिक हेपेटायटिस दिवस साजरा केला जातो. 

हेपेटायटिसला मराठीमध्ये 'यकृतदाह' असेही म्हटले जाते. हेपेटायटिसचा धाेका ओळखून त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आज नवीन मार्गदर्शक सूचना काढणार आहे. 2021पर्यंत 42 लाख रुग्णांना घरबसल्या उपचार देण्याची योजना सरकारकडून आखण्यात आली आहे.

संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जनजागृती झाली आहे, त्याच धर्तीवर हिपॅटायटिसबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. टीबीसोबतच सरकारने देशातील हेपेटायटिसवर एक योजना तयार केली आहे. या रोगातून लोकांना वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे.

हेपेटायटिस ए

  • दाट लोकसंख्या, अस्वच्छता, पाण्याचे कृत्रिम साठे, दूषित अन्नपदार्थ, उघड्यावरील व कच्चे अन्न यांचे सेवन यामुळे याची प्रामुख्याने लागण होते.

हेपेटायटिस बी

  • रक्ताशी संबंधित व्यसनाधीनता, शारीरिक संबंध आणि मातेकडून बाळालाही याची लागण होऊ शकते. या विषाणूमुळे यकृताचे विविध आजार भविष्यात होऊ शकतात.

हेपेटायटिस सी 

  • या विषाणूचे संक्रमण ‘बी’प्रमाणेच होते. या विषाणूची लागण झाली तरी रोगाची तीव्रता अत्यंत कमी प्रमाणात दिसून येते.
  • कधीकधी १० ते २० वर्षे याची कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. पण २० किंवा ३० वर्षांनीही हा आजार समोर येतो. पेशंटला ताप येतो, जेवणाची इच्छा कमी होते.
  • मळमळते, उलट्या होतात. छातीच्या उजव्या बाजूस यकृताच्या ठिकाणी तीव्र वेदना होणे अशी प्राथमिक लक्षणे आहे.

हेपेटायटिस रोखण्यासाठी...

> स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा
> शिजवलेले ताजे अन्न खा
> पाण्याच्या स्वच्छतेबाबत शंका असल्यास उकळलेले पाणी किंवा बाटलीबंद पाणी प्या
> कच्च्या भाज्या धुतलेल्या व व्यवस्थित स्वच्छ केल्या असतील तरच कच्च्या खा
> हेपेटायटिसची साथ असलेल्या भागात जाणार असाल तर ‘हेपेटायटिस ए’ची लस घ्या
> आपण जर रोगवाहक असल्यास आपल्या जोडीदाराला त्याची माहिती द्या
> टूथब्रथ, रेझर किंवा मॅनिक्युअरची साधने सामूहिक पद्धतीने वापरू नका
> मद्यपान पूर्णपणे टाळा

जगातील आठव्या क्रमांकाचा जीवघेणा आजार

> हेपेटायटिस बऱ्याच विषाणूमुळे होऊ शकतो. पण प्रामुख्याने सहा विषाणू असे आहेत की त्यांना हेपेटायटिसचे विषाणू म्हणून ओळखले जाते.
> हेपेटायटिस ए , बी, सी, डी, ई, व जी असे सहा विषाणू आहेत.
> या विषाणूंसह दुसरे विषाणूही हेपेटायटिस होण्यास कारणीभूत. उदा. यलो फिव्हर विषाणू व इतर अनेक आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य