الخميس، 17 كانون2/يناير 2019

आयकर रिटर्न भरले नसेल तर...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वर्ष २०१७-१८ आयकर रिटर्न दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख ३१ जुलै आहे. या आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. जर अजुनही तुमचा आयकर रिटर्न भरला नसेल तर आता शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका.

कारण ऑनलाईन अर्ज भरताना शेवटच्या काही दिवसांत वेबवसाईटवर लोड आल्यास समस्या निर्माण होऊ शकते. त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. आयकर विभागाकडून रिटर्न वेळेत न भरणाऱ्यांना दंड आकारण्यात येणार आहे. 

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ३ महिने व्हॅट कायदा व ९ महिने जीएसटी कायदा लागू होेता. याआधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल व इतर माहिती आयकर रिटर्नमध्ये द्यावयाची गरज नव्हती, परंतु आता शासनाने आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगितले आहे.

 

आयकर रिटर्न दाखल करताना पुढील गोष्टी करा...

  • उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा  जास्त असेल तर आयकर रिटर्न ई-फाइल करणे आवश्यक आहे. मात्र, यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी सवलत देण्यात आली असून त्यांना अर्जाद्वारे ऑफलाईन आयकर रिटर्न भरता येणार आहे.
  •  आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या अर्जामध्ये स्वत:ची सर्व माहिती खरी द्या. 
  • करातून वाचण्यासाठी आपले उत्पन्न कमी सांगणे हा गुन्हा आहे. जर अशी बाब समोर आली तर मोठ्या दंडासह तुरुंगातही जायला लागू शकते. सध्या सर्वांचे पॅन कार्ड असल्याने उत्पन्नाची माहिती सहज उपलब्ध होते. त्यामुळे चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केल्यास पकडले जाण्याची शक्यता आहे. यासाठी सत्य माहिती द्या.
  • पहिल्यांदा आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांकडून अनेकदा पडताळणी करणे राहून जाते. आयकर रिटर्न भरल्यानंतर त्याची पडताळणी देखील करायची असते. ऑनलाईन ई-फाइल केल्यानंतर त्याची आयकर विभागाच्या पोर्टलवरुन पडताळणी करता येते. 

 

विलंब झाल्यास अतिरिक्त शुल्क

वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्यांना वेळेनंतर आयकर रिटर्न भरल्यास एक हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ३१ जुलैनंतर ५ हजार तर ३१ डिसेंबरनंतर १० हजार रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

 

आयकर विवरणपत्र भरणे कोणासाठी गरजेचे?
कर भरल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही. जर आपले उत्पन्न २०१७-२०१८ मध्ये वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर रिटर्न भरणे गरजेचे आहे. यामुळे परतावा लवकर मिळण्यास मदत होते. 

 

आर्थिक वर्ष 2017-18 साठी आपले आयकर रिटर्न्स भरताना तुमचेकडे असले या 10 दस्तऐवज - 

1. फॉर्म 16
2. पगाराची पावती
3. बँक आणि पोस्ट ऑफिसमधील व्याज प्रमाणपत्रॉ
4. फॉर्म 16 अ / फॉर्म 16 बी / फॉर्म 16 सी

5. फॉर्म 26AS

6. कर-बचत गुंतवणुकीचा पुरावा

7. कलम 80डी ते 80यू अंतर्गत कोणत्याही कपातीचा पुरावा

8. बँकेकडून गृहकर्ज निवेदन

9. भांडवली लाभ

10. आधारकार्ड

 

कोणत्या करदात्याला जीएसटीची माहिती द्यावी लागेल?

  • ज्या व्यक्तीचे उत्पन्न व्यवसायापासून आहे व जो जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहे, त्याला जीएसटीची माहिती द्यावी लागेल.
  • ज्या व्यक्तीचे उत्पन्न नोकरीपासून व इतर उत्पन्न असेल, तर त्याला आयकराचा आयटीआर १ व आयटीआर २ दाखल करावा लागतो. त्यामध्ये जीएसटीच्या माहितीची गरज नाही.
  • आयटीआर ३ ते ६ मध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागेल. ज्या व्यवसायिक वैयक्तिक व एचयूएफ करदात्यांचे टॅक्स आॅडिट नाही, त्यांना आयटीआर-३ किंवा-४, ३१ जुलैआधी दाखल करावा लागेल.

आयटीआर ३ मध्ये कोणती माहिती द्यावी लागेल?

१. करदात्याला विक्रीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी किती आकारला, ती रक्कम नमूद करावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक लायबलिटी रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

२. करदात्याला खरेदीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटीच्या क्रेडिटची माहिती द्यावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

३. करदात्याला त्याने वर्षभरात जीएसटी भरल्याची माहिती नमूद करावी लागेल. ही माहिती जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

४. करदात्याला सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटीची ३१ मार्च २०१८ चे देय रक्कम रिटर्नमध्ये नमूद करावी लागेल.

५. जर शासनाकडून जीएसटीचा रिफंड येणे बाकी असेल, तर त्याची माहिती रिटर्नमध्ये द्यावी लागेल.

आयटीआर ४ मध्ये जीएसटीची कोणती माहिती द्यावी लागणार आहे?

  • अर्जुना, आयटीआर ४ मध्ये जीएसटीच्या रिटर्नमध्ये दाखविलेली उलाढालीची रक्कम नमूद करावी लागेल.
  • करदात्याने दाखल केलेल्या जीएसटीआर १ रिटर्नमधून ती मिळेल, तसेच करदात्याचा जीएसटीचा नंबर या रिटर्नमध्ये नमूद करावा लागेल.
loading...

Top 10 News

राशी भविष्य