الخميس، 15 تشرين2/نوفمبر 2018

भगवतगीतेच्या मुद्द्यावरून महाभारत...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्याच्या उच्चशिक्षण विभागानं काढलेल्या एका अजब परिपत्रकामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय. राज्यातल्या सर्व अशासकीय अनुदानित नॅक मानांकन प्राप्त 100 महाविद्यांलाना भगवत गीतेच्या 100 प्रती वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत.

तसचं हे वाटप झाल्याची पावतीही सादर करण्यास सांगण्यात आली आहे. भगवत गीतेच्या पुस्तकांचे संच विभागाला मिळाले आहेत ते महाविद्यालयांनी घेऊन जावे असं सांगण्यात आले आहे.

मात्र या आदेशामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय. सरकार कोणता धार्मिक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहे का ? असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य