الإثنين، 10 كانون1/ديسمبر 2018

सायबर क्राईमच्या संख्येत वाढ, 2017 मध्ये 4035 गुन्ह्यांची नोंद

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

वृत्तसंस्था, मुंबई

राज्यातील सायबर गुन्ह्यंना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष पाऊल उचलले असून राज्यात यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यात सायबर गुन्ह्यंमध्ये वेगाने वाढ होत असून त्या तुलनेत एक टक्क्यापेक्षा कमी प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाल्याचे दिसून येत असल्याचा मुद्दा सतेज पाटील, संजय दत्त, शरद रणपिसे आदींनी एका प्रश्नाद्वारे उपस्थित केला. 2016 साली 2380 सायबर गुन्हेची नोंद करण्यात आली होती, तर 2017 मध्ये 4035 गुन्हे नोंदविण्यात आले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य