الإثنين، 19 تشرين2/نوفمبر 2018

गुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जागतिक महिला दिना निमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून स्त्रीयांना मानवंदना दिली आहे. महिला दिन विशेष डूडल साकारत गुगलने स्त्री शक्तीची कहाणी सांगितली आहे. गुगल मधील दुसरा O मोठा बनविण्यात आला आहे. यामध्ये एक महिला लोकरमध्ये काहीतरी विणताना दिसते आहे. तसंच त्यामध्ये एक प्लेचं चिन्ह देण्यास आलं आहे.

या प्ले चिन्हावर क्लिक केल्यावर 12 विविध फोटो खुले होतील. हे 12 फोटो रिकामे नसून प्रत्येक फोटोमध्ये एक कहाणी दडलेली आहे. यामध्ये पहिल्या फोटोवर एक महिला पेंटिंग करताना दिसते. यामध्ये एका बाईची कहाणी आहे. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन हात दिसतील. याबरोबर काही झाडंही फोटोमध्ये पाहायला मिळतील. 'माय आंट ब्लॉसम्स' असं फोटोवर लिहिण्यात आलं आहे. हा फोटो पाहताना नेक्स्टवर क्लिक केल्यावर नवा फोटो पाहता येईल. 'माझी काकी खूप खूश आहे' असं या फोटोवर आहे. यानंतर दुसऱ्या फोटोवर गेल्यावर एक काट्यांसारखी गोष्ट महिलेचा पाठलाग करताना दिसते.'पण एक दिवस काकीला कॅन्सर झाला', असं फोटोमध्ये लिहिलं आहे. यानंतर पुढील फोटोमध्ये गेल्यावर त्यात तुम्हाला तीन फोटो दिसतील. त्या फोटोमध्ये एक महिला उभी आहे. त्या महिलेला संपूर्ण काट्यांनी वेढलं आहे. 'सगळं काही बदललं', असं कॅप्शन फोटोला आहे.

पुढील फोटोमध्ये गेल्यावर पुन्हा तीन फोटो पाहायला मिळतील. 'हा प्रवास खूप कठीण होता' असं या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. पण यानंतर महिलेला तिच्या शक्तीचा अंदाज आला. या फोटोनंतरच्या फोटोमध्ये ती महिला पुन्हा एका झाडासोबत दिसते आहे. नंतरच्या फोटोमध्ये सगळं बदललेलं पाहायला मिळतं आहे. फोटोमधील महिला झाडं, वेली, फुलं, पक्षांशी पुन्हा खेळताना दिसते आहे. 

स्त्रीच्या शक्तीची कहाणी सांगत गुगलने डूडलच्या माध्यमातून स्त्रीशक्तीला मानवंदना दिली आहे. डूडलमध्ये असलेले बारा विविध फोटो स्त्रीशक्तीची कहाणी सांगत आहेत.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य