الجمعة، 16 تشرين2/نوفمبر 2018

नेटवर्क नसतानाही WiFi Calling...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मोबाईल नेटवर्क अचानक गेल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही समस्या दूर करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे.

दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठ्याबाबतच्या परवान्यात काही बदल केले आहेत. ज्यामुळे कंपनीला सेल्युलर सर्व्हिस आणि इंटरनेट टेलीफोनी सर्व्हिस या दोंन्हीसाठीही एकच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे असं ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात म्हटलं आहे.

खराब नेटवर्क आणि कॉल ड्रॉपचा फटका बसणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने ही शिफारस केली होती.

कसा असेल वायफाय कॉल?

  • ग्राहकांना इंटरनेट टेलीफोनीसाठीच्या वापरासाठी एक अॅप डाऊनलोड करावे लागेल.
  • हे अॅप ग्राहकांना त्यांची टेलीकॉम कंपनीच उपलब्ध करून देईल.
  • त्यामुळे तुमच्याकडे ज्या कंपनीचे सिमकार्ड असेल त्याच कंपनीचा टेलीफोनी मिळेल.
  • सिमकार्डबरोबर लिंक असणारा नंबरच तुम्ही वापरु शकाल.
  • ग्राहक दुसऱ्या कंपनीचेही टेलीफोनी अॅप डाऊनलोड करू शकतात.
  • त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरसारखाच एक दहा अंकी नंबऱ मिळेल, ज्याचा कॉल करण्यासाठी तुम्ही वापर करु शकाल.


इंस्टाग्रामची आता यूट्यूबला टक्कर....

गुगलकडून डूडलच्या माध्यमातून ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा...

व्हाटसअॅपचा हा नवा फिचर सांगणार तुम्हाला आलेला मेसेज खरा कि खोटा ?...

शाओमीचे नवीन स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट्स...

loading...

Top 10 News

राशी भविष्य