الأحد، 20 كانون2/يناير 2019

जगातला पहिला स्पिनर मोबाईल फोन भारतात लाँच; फिचर्स स्मार्टफोनला टक्कर देणारे

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

जगातला पहिला वहिला स्पिनर मोबाईल भारतात लाँच झाला आहे. हाँगकाँगच्या चिल्ली इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने जगातला पहिला स्पिनर मोबाईल K188,AGPS आणि F05 भारतीय बाजारपेठेत आणला आहे.

 

हा फिचर फोन सप्टेंबर 2017 पासून अॅमेझॉन,फ्लिपकार्ट,शॉपक्लुझ व पेटीएमवरही उपलब्ध होणार आहे. या फिचर फोनची किंमत 1200 ते 1300 रुपयांपर्यंतच ठेवली आहे.

 

लवकरच हा फोन भारतातील काहूी प्रमुख स्टोअर्समध्येही उपलब्ध होईल. स्वस्तात मस्त अशा किंमतीत उपलब्ध असलेल्या या फिचर फोनचा वापर फिडगेट स्पिनरबरोबरच आपल्या स्मार्ट फोनचा ब्लूटूथ डिव्हाइस म्हणुनही करता येऊ शकतो.

 

नुकताच लाँच झालेला हा फोन साधारण फोन नसून हे फिडगेट स्पिनर, फिचर फोन आणि ब्लूटूथ हे एक अनोख कॉम्बिनेशन आहे.

 

तसंच या फोनमध्ये इमेज, व्हिडियो आणि इंटरनेट एक्सेसिबिलिटीबरोबरच म्यूजिक सपोर्टसाठी मल्टीमीडिया ऑप्शन्सदेखील दिलेले आहेत.

 

हे प्रोडक्ट भारतातील ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर्सवर उपलब्ध आहे.

 

तसेच या फोनचे गोल्डन, सिल्वर, ब्लॅक, ब्लू आणि रेड असे एकुण 6 आकर्षक कलर ऑप्शनही उपलब्ध आहेत.

loading...

Top 10 News

19 كانون2/يناير 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jan 20 12:37:01 +0000 2019

सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार साराच्या त्या प्रश्नाला कार्तिकने दिले 'हे' उत्तर वाचा सविस्तर -… https://t.co/4VS9jc8HID
Jai Maharashtra News
Sun Jan 20 11:12:30 +0000 2019

... म्हणून विरोधक ईव्हीएमला 'व्हिलन' ठरवत आहेत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल वाचा सविस्तर -… https://t.co/1Bvl4hW0ga