السبت، 15 كانون1/ديسمبر 2018

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची निवड

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची मंगळवारी रात्री उशिरा एकमताने निवड करण्यात आली आहे.

 

तर, झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम

पाहणार आहे.

 

बीसीसीआय कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना यांनी याबाबत माहिती दिली. रवी शास्त्रींचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा म्हणजेच 2019 चा वर्ल्डकप संपेपर्यंत

असणार आहे.

 

याच महिन्यात सुरू होत असलेल्या श्रीलंका दौऱ्यापासून ते या पदाची धुरा सांभाळणार आहे. रवी शास्त्रीबरोबरच वीरेंद्र सेहवागही या पदासाठी प्रबळ दावेदार मानला जात

होता.

 

मात्र शास्त्रींनी बोर्डाची आणि सीएसीची पसंती मिळवण्यात यश मिळवले आहे. रवी शास्त्री यांनी याआधी टीम इंडियाचे संचालक म्हणून काम पाहिले.

 

विराट कोहलीशीही त्यांचं चांगलं ट्युनिंग पाहायला मिळाले. त्यामुळेच 2019च्या वर्ल्डकपसाठी संघबांधणीचे आव्हान लक्षात घेऊनच 55 वर्षीय अनुभवी रवी शास्त्रींकडे

प्रशिक्षकपद सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.

 

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच 

 

- 80 टेस्ट, 150 वन-डेत टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व

- क्रिकेट समालोचकाची पार पाडली भूमिका

- ऑगस्ट 2014मध्ये टीम इंडियाच्या डायरेक्टरपदी

- भारताची 2015 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक

- 2016 टी-20 वर्ल्ड कपची गाठली सेमीफायनल

- शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टेस्टमध्ये टीम इंडिया नंबर 1

- 2016मध्ये हुकली टीम इंडियाच्या कोचपदाची संधी

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card