الأربعاء، 21 تشرين2/نوفمبر 2018

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.

परिवहन विभागानं ८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना तात्पुरत्या बंदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत खासगी वाहने, लग्झरी बस, एसटी बस आदींची संख्या मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे या कालावधीत अवजड वाहनांना बंदीचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे.

गणेश चतुर्थी, विसर्जनाचे दिवस लक्षात घेऊन त्याप्रमाणे इतर दिवसांमध्ये सूट जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य