الخميس، 17 كانون2/يناير 2019

बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्याखाली!

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याखाली भूमिगत स्वरूपात बांधलं जाणार आहे. तसेच हे स्मारक 9 हजार चौरस फुटांच्या जागेत होणार आहे.

त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड अथवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे.

त्यामुळेच या वास्तूचं जतन करुन त्याचं पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य