الأربعاء، 16 كانون2/يناير 2019

बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेस नेत्याची मुक्तता

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एसीबीच्या केसमधून मुक्त करण्यात आले आहे. कोणत्याही लोकनेत्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात ती घेण्यात आली नसल्याने कृपाशंकरसिंह यांच्याविरोधात खटला चालवताच येणार नसल्याचं त्यांच्यावतीने एसीबी कोर्टात सांगण्यात आले.

आरोपपत्रानुसार कृपाशंकर यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांना त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत दाखल झालेल्या खटल्यातून दिलासा मिळाला आहे. आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपात एसीबीने कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य