السبت، 17 تشرين2/نوفمبر 2018

...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया

تقييم المستخدم: 4 / 5

تفعيل النجومتفعيل النجومتفعيل النجومتفعيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेतील 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे दुखावलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांत हल्ला चढवला.

तर, या कारस्थानामागे केवळ दिलीप लांडे यांची खेळी असल्याचा राज ठाकरे यांनी आरोप केला होता

मात्र, गेली अनेक वर्षे माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला मनसे सोडावी लागली असं स्पष्टीकरण दिलीप लांडे यांनी दिले.

गेली अनेक वर्षे माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला मनसे सोडावी लागली. राज साहेब यांनी यांना मी उत्तर देणार नाही. मात्र, इतरांची टीका मी ऐकून घेणार नाही असे दिलीप लांडे म्हणाले.

दिलीप लांडे यांना विकत घेणारा अजून पैदा झाला नाहीत. या आधी ही अनेक आमदार पक्ष सोडून गेलेत.

मनसे सोडून स्वगृही जावा अस वाटत नव्हतं. मात्र, अन्याय किती सहन करायचं. माझ्यावर जबाबदारी दिली मी मरमर काम केलं आणि नंतर ती जबाबदारी काढुन घेतली.

दोन वर्षे साहेबांपर्यंत पोहचू दिल जात नव्हत. ज्याला आपल्या बायकोचं डिपॉजीत वाचवता आलं नाही त्याने आम्हाला काय मार्गदर्शन करावं. त्या संदीप देशपांडे यांचं नाव नाही घ्यायचं मला.

लेटर लिहिण्याची गरज नाही ज्याला यायचं त्याने यावा आणि चौकशी करावी. माझ्या घराचे दरवाजे खुले आहेत.

सहा नगरसेवक आहेत ते लहान मूल नाहीत. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी शिवसेनेकडून कोणतीही मागणी केली नाही. माझ्या कामाच मुल्यमापन करून मला जबाबदारी द्यावे असे सांगीतल्याचे लांडे म्हणाले.  

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य