السبت، 15 كانون1/ديسمبر 2018

अल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पवईत फिल्टर पाड्यामध्ये 2 मुलांवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच, अंधेरीच्या डी.एन नगर परिसरात 15 मुलांनी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या वर्षापासून पीडित मुलावर अत्याचार सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

आरोपींनी त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिपही शूट केली होती. पीडित मुलानं अत्याचाराबाबत कुठेही वाच्यता केल्यास ही क्लिप व्हायरल करु अशी धमकी आरोपींकडून देण्यात येत होती. पीडित मुलानं या बाबत आपल्या आई-वडीलांकडे तक्रार केली असता आई- वडिलांनीही त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिकांनी त्याला वाचवलं आणि पोलिसांची मदत घेतली.

 

दरम्यान, पोलिसांनी त्वरीत कारवाई करत 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 9 अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं आहे. तर 5 जणांचा शोध अद्याप सुरु आहे. या घटनेमुळे समाजात वाढणाऱी विकृती पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. लोकांवर कायद्याचा धाक नसल्यानं निष्पाप लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. सरकारनं लवकरांत लवकर अशा गुन्हांसाठी कडक शिक्षा करण्याची गरज आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य