الإثنين، 10 كانون1/ديسمبر 2018

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

पतीने दगडी पाटा डोक्यात घालून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे घडली आहे. पती प्रकाश धांडे याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शांता हिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबतची फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आरोपी प्रकाशला पोलिसांनी तात्काळ अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश धांडे मुळचा अकोले तालुक्यातील आंबेवंगन येथील रहिवाशी आहे. मात्र नोकरीनिमित्त धांडे पत्नी शांतासह श्रीगोंदा येथे राहत होता. तेथे एका खासगी शाळेत तो शिपाई तर पत्नी शांता ही स्वयंपाकीण म्हणून कामाला होती.

आजीचा दशक्रिया विधीसाठी प्रकाश धांडे त्याची पत्नी शांतासोबत जवळे बाळेश्वर येथे साडू बाळु घोडे यांच्याकडे आला होता. प्रकाश धांडे आणि पत्नी शांता यांचं रात्री भांडण झाले होते. सर्वांनी समजवल्यानंतर दोघेही शांत झाले होते. मात्र आरोपी प्रकाशने रात्री 2 वाजताच्या सुमारास घरात झोपलेल्या पत्नी शांताच्या डोक्यात दगडी पाटा घातला.

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने शांता यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी आरोपी प्रकाशला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य