الخميس، 13 كانون1/ديسمبر 2018

मुलीला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांना कळला 'हा' भीषण प्रकार!

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

मंदिरात देवदर्शनाला चाललेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची पाशवी घटना पुण्याच्या हिंजवडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

बारा वर्षाच्या दोन्ही मैत्रिणी रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला निघाल्या होत्या. तेव्हा गणेश निकम आणि त्याचा अल्पवयीन मित्राने दोघींना चॉकलेटचे आमिष दाखवून जवळच्या शेतात नेलं आणि दोघींवरही बलात्कार केले. त्या दिवसापासून दोघींच्याही पोटात दुखत होतं. त्यापैकी एका मुलीला या घडलेल्या घटनेतून सावरणं कठीण झालं आणि ती बेशुद्ध पडली. तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या तपासात हा प्रकार समोर आला.

हिंजवडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने घटनाक्रम सांगितला. हिंजवडी पोलिसांनी गणेशला अटक तर अल्पवयीन मुलाला ही ताब्यात घेतलंय. या दोघांचे वडील कासारसाई येथील साखर कारखान्यात कामाला आहेत, तर पीडित मैत्रिणी ऊसतोड कामगारांच्या मुली आहेत.

रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य