الإثنين، 10 كانون1/ديسمبر 2018

सुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जगप्रसिद्ध आणि लहान मुलांच्या मनात घर करणारे स्पायडर-मॅन, एक्स-मॅन, हल्क, आयरन मॅन, ब्लॅक पॅंथर, थौर, डॉक्टर स्टेंज आणि कॅप्टन अमेरिका हे पात्र घडवणारे  स्टेन ली यांचे सोमवारी रात्री निधन झाले. 

मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्टिमर-मॅन, हल्क यांचे कॉमिक बुक सुपरहिरोला अस्तित्वात आणणारे स्टेन ली यांनी  वयाच्या 95 व्या वर्षी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते अनेक आजारांवर झुंज देत होते.

ली यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. 1961 मध्ये 'दि फैंटास्टिक फोर' यासह त्यांनी मार्वल कॉमिक्सची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्पायडर-मॅन, एक्स-मॅन, हल्क, आयरन मॅन, ब्लॅक पॅंथर, थौर, डॉक्टर स्टेंज आणि कॅप्टन अमेरिका यासारख्या पात्रांचा समावेश केला.

कॉमिक्स व्यतिरिक्त, ली यांनी चित्रपटांमध्ये स्क्रीनप्ले देखील लिहिले. ली यांचे कॉमिक्स जगभर प्रसिद्ध आहेत. 2013 मध्ये लीने पहिले भारतीय सुपरहीरो चित्रपट बनवला होता. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनेशनल यांच्या भागीदारीत चक्र : द इंविंसिबल या अॅनिमेटेड चित्रपटाला कार्टून नेटवर्कवर प्रदर्शित करण्यात आले. 

स्टेन ली यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलीनं दिली. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य