الخميس، 15 تشرين2/نوفمبر 2018

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा वादात, मांसाहारी जेवण केल्याची चर्चा

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले असतांना नवीन वाद निर्माण झाला आहे.

नेपाळमध्ये राहुल गांधी यांनी एका रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी जेवणाची मागणी केल्याचं वृत्त नेपाळमधल्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

मात्र आता राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलने यासंदर्भात स्पष्टीकरण देत राहुल गांधींनी शाकाहारी जेवण केल्याची माहिती दिलीये. 4 दिवसांपूर्वी राहुल गांधींनी मानसरोवर यात्रेला सुरुवात केली आहे.

मानसरोवर यात्रेसाठी दिल्लीहून निघालेले राहुल गांधी 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजता काठमांडूमध्ये हॉटेल र्याडिसेनमध्ये थांबले होते. मानसरोवर यात्रेसाठी ते आता काठमांडूहून चीनच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांची ही यात्रा 12 दिवस चालणार आहे.

''राहुल गांधींनी शुद्ध शाकाहारी जेवण केल्याचं हॉटेलने स्पष्ट केलं असल्यामुळे हा वाद निरर्थक आहे. हा भाजपचा अजेंडा आहे. भाजपला राहुल गांधींच्या मानसरोवर यात्रेत विघ्न आणायचं आहे. ही देव आणि दानवांची लढाई आहे,'' असं काँग्रेसने म्हटलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य