الأربعاء، 14 تشرين2/نوفمبر 2018

'राफेल डीलमुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान' प्रियंका चतुर्वेदींचा आरोप

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

राफेल डीलमुळे नाशिक एच ए एल सह महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आज केला.
विमान तयार करणारी सरकारी कंपनी नाशिकचं एच.ए.एल. असतानादेखील हे डील खासगी कंपनी सोबत करण्यात आली आहे.

या राफेल डील मधे मोठा भष्ट्राचार झालेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही केली होती मात्र चौकशी पारदर्शकपणे होत नसल्याने आम्ही यापुढे न्यायालयीन लढाईसह रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची देखील माहिती चतुर्वेदी यांनी दिली.

पत्रकार परिषदेत आणखी काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?


राफेल डीलमध्ये 41,205 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
तसंच कर्जातील रिलायन्स ग्रुप ला वाचवण्यासाठी मोदींनी राफेल डील रिलायन्स कंपनी सोबत करून हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप चतुर्वेदी यांनी केला.
तसंच मोदी हे प्रधानमंत्री नव्हे प्रचारमंत्री असल्याचंदेखील त्या म्हणाल्या.
देशात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा निर्णय अत्यंत चुकीचं आहे असं आम्ही म्हटलं होतं आणि आज ते आरबीआयच्या रिपोर्टनंतर खरं ठरलंय अस देखील त्या म्हणाल्या.
या नोट बंदीच्या निर्णयानंतर अनेकांचे रोजगार गेले, उपासमारीची वेळ अनेकांवर आली या सर्व प्रश्नाचे उत्तर मोदी यांनी द्यावं अशी मागणी देखील चतुर्वेदी यांनी केली.

loading...

Top 10 News

13 تشرين2/نوفمبر 2018

राशी भविष्य