الأربعاء، 16 كانون2/يناير 2019

केरळमधील पूर मानवनिर्मित!

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज

 

केरळमध्ये गेल्या शंभर वर्षांतील सर्वांत भीषण पूर आला आहे. या भीषण आपत्तीत 300 हू अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. केरळवासीयांच्या पुनर्वसनासाठी सरकारतर्फे मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यांना देशभरातून मदतही मिळत आहे. मात्र मुख्य प्रश्न असा आहे, की केरळमध्ये यंदा प्रलयस्थिती का निर्माण झाली? ही केवळ नैसर्गिक आपत्ती आहे, की यासाठी माणूस जबाबदार आहे?

 

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि पश्चिम घाट संवर्धन समितीचे माधव गाडगीळ यांनी मात्र हा पूर मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे. एवढंच नव्हे, तर गाडगीळ यांनी केरळमध्ये पूर परिस्थितीचं 2011 साली भाकीतही केलं होतं. गाडगीळ यांचा अभ्यासपूर्ण अहवाल सरकारने फेटाळून लावला होता. मात्र त्याचेच परिणाम आता दिसत आहेत.

 

पावसाचं संकट जरी नैसर्गिक आपत्ती असली, तरी पुरासाठी मात्र मानवच जबाबदार आहे,

याची काय आहेत कारणं, ते पाहा-

 

पाणी व्यवस्थापनाचं अज्ञान

ठराविक मध्यंतराने धरणांतून पाणी सोडण्य़ाऐवजी एकाच वेळी सर्व धरणांतून पाणी सोडण्यात आलं

यामुळे लाखो लीटर पाणी शहरांत शिरलं

पेरियार नदीपासून अवघ्या 400 मीटर बांधलेल्या कोची विमानतळात पाणी शिरलं

पश्चिम घाटात सुरू आसलेली अनियंत्रित डोंगरफोड

सर्वच पक्षाचे राजकारणी चालवत असलेल्या अवैध दगडखाणी

यांसारख्या कारणांमुळे पर्यावरणाची अपरीमित हानी झाली.

सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय लोकांनी मिळून पर्यावरणाचा –हास केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य