السبت، 17 تشرين2/نوفمبر 2018

आदिशक्तीचा अवतार सप्तशृंगी देवी

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीममहाराष्ट्रात वसलेल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ मानलं जाणाऱ्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेलं आहे. अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेली सप्तशृंगी देवी ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप असल्याचे मानले जाते.

 

मंदिराचं वैशिष्ट्य असं की, गाभाऱ्याला असलेल्या तीन दरवाजांना शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या नावांनी ओळखले जाते. विशेष म्हणजे या तिन्ही दरवाजांतून देवीचे दर्शन घडते.

 

सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू आहे. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदुराने लिंपलेली आहे. देवी सप्तशृंगीने प्रत्येक भुजांमध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले,कमरपट्टा, पायात तोडे, अशा अलंकारांनी नटलेली देवी सप्तशृंगी गाभाऱ्यात विराजली आहे. 


गडावर जाण्यासाठी नाशिक सी.बी.एस. व दिंडोरी नाका येथून बसगाड्या उपलब्ध आहेत तसेच उत्सवादरम्यान जास्तीच्या एस.टी.बसेसची सोयही करण्यात आलेली असते.

loading...