السبت، 22 أيلول/سبتمبر 2018

माझी रेणुका माऊली..

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजेच माहूरची रेणुका देवी. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर गावातील गडावर रेणुका देवीचे मंदिर आहे. संपूर्ण जगाची आई, जगदंबा अशीही या देवीची ओळख आहे. कर्नाटकात या देवीला यल्लमा म्हणून संबोधले जाते.

 

माहूर गडावर रेणुका देवीचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 800 ते 900 वर्ष जुने आहे. मंदिर वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे. देवीचा मुखवटा हा 5 फुट उंचीचा आहे आणि त्याची रुंदी 4 फुट इतकी आहे.

रेणुका मातेच्या तांदळयाची पूजा का केली जाते?

 

याबाबत अनेक पुराण कथा आहेत. त्यापैकी एका पौराणिक दाखल्यानुसार माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले.

जमदग्नीकडे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय होती. राजा सहस्त्रार्जुनाला या गायीचा मोह झाला. मात्र, जमदग्नीने कामधेनू देण्यास नकार दिला. यामुळे सहस्त्रार्जुनाने जमदग्नीवर हल्ला केला. यात जमदग्नींचा मृत्यू झाला. 

 

पुत्र परशुरामाने पित्याचे अंत्यसंस्कार माहूर गडावर केले. जमदग्नीच्या अंत्यसंस्कारानंतर माता रेणुका सती गेली. सती गेलेल्या मातेच्या विरहाने परशुराम दु:खी झाला. तेव्हा, आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येईल, फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको, असे सांगण्यात आले. परंतु परशुरामने उत्सुकतेपोटी लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते. हीच तांदळास्वारुपातले मुख असलेली माहूरची रेणुका माता असल्याची आख्यायिका आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य