الأربعاء، 23 كانون2/يناير 2019

चंद्रपुरात वीजप्रवाहाच्या तारांचा शॉक लागून वाघाचा मृत्यू

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

चंद्रपुरात पुन्हा एका वाघाचा विजप्रवाह सोडलेल्या तारेत अडकून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना मोधोली बफर वन परिक्षेत्रातील भामडोली शिवारात घडली आहे. मृत वाघ हा तारा नावाच्या वाघिणीचा 3 वर्षांचा बछडा होता.

ताडोबा बफर झोनमधील भामडेळी येथील एका शेतात वीजप्रवाह सोडलेला होता. पिकांचं वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी हा वीजप्रवाह सोडला जातो. वाघाच्या मृत्यूची चौकशी वन विभाग करत असला तरी वाघांच्या मृत्युचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत चाललं आहे.

ज्या वाघाचा मृत्यू झाला आहे त्याला छोटी ताराच्या नावाने ही ओळखले जात होते. वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमीची चिंताही वाढत चालली आहे.

loading...

Top 10 News

19 كانون2/يناير 2019

राशी भविष्य