الإثنين، 10 كانون1/ديسمبر 2018

केंद्रीय मंत्री अनंतकुमार कालवश

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन झाले. वयाच्या 59 व्या वर्षी रात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कर्नाटकातील शाळा आणि महविद्यालयांना आज एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे....

बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कर्नाटकातील भाजपाचे वरिष्ट नेते असलेल्या अनंतकुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रद्धांजली वाहिली.

बंगळुरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. अनंत कुमार हे एक अतिशय चांगले नेते होते. त्यांनी आपल्या युवा काळात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी संपूर्ण निष्ठेने समाजाची सेवा केली. त्यांच्या चांगल्या कामांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत असं ट्वीट करत त्यांनी श्रद्धांजली वाहिलीये तर संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी देखील अनंत कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

  • अनंतकुमार दक्षिण बेंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
  • १९९६ पासून हा मतदारसंघ त्यांचा गड राहिला.
  • या मतदारसंघातून ते सहावेळा निवडून आले.
  • केंद्रीय मंत्रिमंडळात २०१४ पासून अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते मंत्री म्हणून पदभार देण्यात आला होता.
  • त्यानंतर जुलै २०१६ पासून त्यांच्याकडे संसदीय कार्य मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली होती.
loading...

Top 10 News

राशी भविष्य