الأربعاء، 19 كانون1/ديسمبر 2018

मुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

दहा दिवस बाप्पांचा मनोभावे पाहुणचारा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. अनंत चतुर्थीनिमित्त आज राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जाणार आहे.

मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी वाजत-गाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाची मिरवणूक सुरु झाली आहे, तसेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रामाणात गर्दी केली आहे.

या गणेश मिरवणुकांमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून प्रशासनही सज्ज झाले आहे.

बाप्पाच्या मिरवणूकीचा जल्लोष

मुंबई

 • मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरु झाली आहे.
 • वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात आज बापाला निरोप दिला जातोय.
 • या राजाला पुष्पवृष्टी करत वेगळी मानवंदना दिली जाते.
 • अलोट गर्दी आणि त्यात राजाची उंच मूर्ती हे दृश्य डोळ्याचे पारणे फेरणारे असते.
 • तर मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

पुणे

 • पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे.
 • तसेच पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रत्येक क्षण टिपण्यासाठी माईंड ग्राफ हा ग्रुप सध्या पुण्यातील प्रत्येक बाप्पाच्या छबी टिपण्यासाठी सज्ज झाला आहे.

नाशिक

 • नाशिकमध्येही सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे.
 • पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या गणपतीची पूजा करून मिरवणुकीला सुरवात झाली.
 • “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या"जयघोष करत नाशिकमध्ये भक्तिमय वातावरणात आज गणरायाचं विसर्जन नागरिक करत आहेत.
 • तसेच गोदावरी नदीच्या प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

नागपूर

 • नागपूर च्या राजाच्या शाही मिरवणुकीला सुरवात झाली आहे.
 • रेशीमबागच्या आपल्या मंडपातून निघालेला नागपूरचा राजा तुळशीबाग,महाल,शुक्रवारी तलाव मार्गे कोरडीला प्रस्थान करणार आहे आहे.
 • पारंपरिक वाद्य व पारंपरिक वेशभूषेत नागपूरच्या राज्याची ही मिरवणूक सुरु झाली आहे.  
loading...

Top 10 News

राशी भविष्य