الخميس، 13 كانون1/ديسمبر 2018

हेल्मेट नाही घातले तर करावी लागेल बाप्पाची आरती

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

नाशिकमध्ये हेल्मेट परिधान न केल्यास वाहनचालकांकडून पावती न फाडता त्या वाहनचालकाला बाप्पाची आरती म्हणायला लावली. नाशिक पोलिसांकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला असून या माध्यमातून हेल्मेटविषयी जनजागृतीही करण्यात आली आहे.

जूना गंगापुर नाका सिग्नलवर मंगळवारी दुपारी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांकडून बाप्पाची आरती करण्यात आली.

'हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन' या चालीवर पोलिसांकडून आरती तयार करण्यात आली होती आणि या आरतीला नाशिक ढोलनेही साथ दिली.

तसेच हेल्मेट घातलेले ढोल वादक यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधुन घेत होते.

गेल्या 8 महिन्यातच शहरात 74 दुचाकी चालकांचा अपघाती मृत्यू झाला असून यापैकी 68 जणांनी हेल्मेट परिधान न केल्याचं समोर आले आहे, आणि हेच प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेटचा वापर करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य