الخميس، 20 أيلول/سبتمبر 2018

खाडीत पहिल्यांदाच आढळला डॉल्फिन मासा

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क जवळील खाडी किनारी डॉल्फिन मासा आज बुधवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडाला जखम झाल्यामुळे रक्तस्त्राव होत होता.

येथील खाडी किनारी कोळीवाडा असून मासेमारीसाठी त्यांच्या बोटी किनाऱ्यावर असतात. सकाळच्या सुमारास किनाऱ्यावर 2 बोटींच्या मध्ये डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला.

रात्री एकच्या दरम्यान खाडीत जाळी टाकण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमाराना कुठल्या तरी मोठ्या माश्याची चाहूल लागली होती.

हा मासा किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीला आदळला व नंतर पुन्हा वेगाने खाडीत परतला होता असे स्थानिक धीरज परब यांनी सांगितले.

हा मासा सुमारे 7 फूट लांब असून तोंडाला जखम झाली आहे तर शेपटी जवळ देखील जखमा आहेत.

पहिल्यांदाच डॉल्फिन दिसून आल्याने लोकांनी मासा बघायला गर्दी केली होती.

तर खाडीतील वाढते जल प्रदूषण, कचरा, प्लॅस्टिक माश्यांच्या जिवावर बेतल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई आणि रायगड परिसरातील समुद्रकिनारी अनेक मोठमोठे मासे मृतावस्थेत सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य