الأحد، 18 تشرين2/نوفمبر 2018

पैशांसाठी करण्यात आली HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी हत्येप्रकरणी 9 सप्टेंबरला पोलिसांनी सरफराज शेख या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता या खुनाचा उलगडा झाला आहे.

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या 35 हजारांसाठी केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.

आरोपी सरफराज शेख गेल्या 3 वर्षांपासून कमला मिलमध्ये फेब्रिकेशनचं काम करत होता.

त्याला पैशांची गरज होती आणि त्यासाठीच त्याने हा खून केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून संघवी यांचा फोनही जप्त केला आहे.

 

या घटनेचा घटनाक्रम नेमका कसा आहे? 

  • ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये गेल्यावर आरोपी सिद्धार्थ संघवी यांच्या कारमध्ये घुसला त्यानंतर संघवी यांना चाकू दाखवत पैशांची मागणी केली
  • त्या दिवशी संध्याकाळी सिद्धार्थ संघवी नेहमी प्रमाणे ऑफिस मधून निघाले
  • संघवी आणि आरोपीच्या झटापटीत आरोपीने संघवी यांचा खून केला 
  • त्यानंतर पार्किंगमध्येच गाडी साफ करून संघवी यांचा मृतदेह गाडीत ठेऊन 7 वाजून 55 मिनिटाने कमला मिल कंपाउंडमधून कार घेऊन निघाला
  • 8.30 वाजता संघवी यांचा फोन बंद असल्याचं घरच्यांच्या लक्षात आलं, त्यानंतर आरोपींने संघवी यांच्या वडिलांना फोन करुन तुमचा मुलगा माझ्याकडे सुखरूप आहे असे सांगितले
  • त्यानंतर कल्याण हाजी मलंग इथे सांघवी यांचा मृतदेह फेकण्यात आला, तिथून कोपरखैरणे इथं गाडी पार्क करण्यात आली

आरोपी सरफराज ने आपण पैशांमुळे संघवी यांचा खून केला असल्याचं कबूल केलं असलं तरी पोलीस या प्रकरणी अनेक शक्यतांवर काम करत आहेत. 

दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य